चांग्याचापाडा, महाराष्ट्र – रयत शिक्षण संस्थेच्या नूतन माध्यमिक विद्यालयात, श्री सत्यसाई सेवा समिती, तलवाडे-ठाणे यांच्या सहकार्याने २४ जून २०२५ रोजी सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी श्री सत्यसाई सेवा समितीचे सेवा सदस्य मच्छिंद्र मराडे (पोलीस पाटील, तलवाडे), संतोष पडवळ (पोलीस पाटील, खराडे), हैबत शिंगे, संतोष शिंदे, प्रकाश साबळे, तसेच आसरा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन शिरकर, आणि माता पालक संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती कीर्ती परब आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना, समिती सदस्य मच्छिंद्र मराडे यांनी विद्यार्थ्यांना सेवेचे महत्त्व पटवून दिले. संतोष पडवळ यांनीही सेवेबद्दल आपले विचार मांडले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर हरणे यांनी विद्यार्थ्यांना दातृत्वाची शिकवण दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक प्रवीण भेरे यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक जयवंत वरकुटे यांनी आभार मानले. कनिष्ठ लिपिक सुनील वाघ यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. वह्या मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून उपस्थित मान्यवरांना समाधान वाटले.